
रत्नागिरीतील चार भगिनीनी अमृतसर येथे जाऊन भारतीय सैनिकांना राख्या बांधल्या
रत्नागिरी : संस्कार प्रतिष्ठानच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्यावतीने भारत-पाकिस्तानच्या अमृतसर येथील अटारी सीमेवरील भारतीय जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीतून चार भगिनींना रक्षाबंधनाला जाण्याची संधी मिळाली. रत्नागिरीतून स्वरूपा सरदेसाई, लीना नलावडे, स्वाती जोशी, मानसी कुलकर्णी यांनी रक्षाबंधन केले.
२०१९ पासून अटारी सीमेवर रक्षाबंधन करण्यात येत आहे. विन्ड कमांडर अभिनंदन यांना २०१९ मध्ये पाकिस्तानने पकडले, त्यांना परत येण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. त्यांची तिथून सुटका झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी झाली. त्यामध्ये पुण्यातील काही बचतगटाच्या महिलांनी शासनाकडे अटारी सीमेवर सैनिकांना राखी
बांधण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातून या रक्षाबंधन उपक्रमाची सुरुवात झाली.
www.konkantoday.com