भारतीय जनता पार्टी रत्नागिरीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय सालीम यांचे दुःखद निधन

भारतीय जनता पार्टी रत्नागिरीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय सालीम यांचे आज दुःखद निधन झाले समाजाभिमुख कामे तळमळीने करणारा कार्यकर्ता, पंचायत समिती सदस्य व उपसभापती पदापासून जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण सभापती पर्यंत त्यांनी झेप घेतली होती कुणबी समाजाचा नेता अशी त्यांची जरी ओळख असली तरी समाजासाठी कामे करताना अथवा पक्षाचे काम करताना त्यांनी कोणतेही जातीपातीचे राजकारण केले नाही.निवळी येथील पंचतारांकित एमआयडीसीच्या आंदोलनामध्ये स्वर्गीय तात्या अभ्यंकर ,काकासाहेब मुळे व विजय सालीम हे अग्रेसर पणे कार्यरत होतेअशा लोकाभिमुख नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.आज रात्री दहा वाजता अलावा, जाकिमिर्या येथील त्यांच्या निवास स्थाना पासून अंत्ययात्रा निघणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button