*दापोली येथे महाराष्ट्रातील पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय निवासी सहविचार सभेचे विशेष आयोजन*
____रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव येथील आम्रपाली होमस्टे या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध भागांतून पर्यावरण स्नेही पर्यावरण विषयी सहविचार सभे करता उपस्थित होत आहेत.निवेदिता प्रतिष्ठान दापोली ,टेलर्स ऑर्गनायझेशन पुणे वृक्षसंवर्धिनी पुणे आणि महाएनजीओ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय निवासी सहविचार सभेचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध पर्यावरण स्नेही आपापल्या परीने निसर्ग संरक्षण करित असतात. मात्र एकीचे बळ फार महत्त्वाचे असून या अनुषंगानेच २०१७ व १८ मध्ये दापोली येथे दोन दिवसाची कार्यकर्त्यांची कार्यशाळा त्याचप्रमाणे २०१८ व २०१९ या वर्षी ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली होती. याप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध भागातून दोन व तीन मार्च रोजी पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवेदिता प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दिली .या सहविचार सभेमध्ये प्लास्टीक कचरा मुक्त शाळा विषयी प्रस्ताव मांडणी. पाणी नियोजन सांघिक लढा. मानसिक बदल घडवून आणणयासाठी संघटित कृती आराखडा. वणवा मुक्त गाव संकल्पना. कचरामुक्त पर्यटन संकुल संकल्पना. कचरा मुक्त मी संकल्पना.आदी विषयांवर चर्चात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे निसर्गाला आरक्षण मागण्यासाठी कृती आराखडय़ासह निवेदन सादरकरण्याबाबत विचारविनिमय होणार आहे.www.konkantoday.com