
*जिल्ह्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना दिली जंतनाशक गोळी*
___रत्नागिरी:- मातीतून प्रसार होणारा कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने मंगळवार 13 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ रत्नागिरीतून करण्यात येउन यादिवशी जिल्हास्तरावर सुमारे ग्रामीण भागातील व शहरी भागातील 1 ते 19 वर्ष वयोगटातील एकूण 3 लाख 7 हजार 510 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळीचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.राष्ट्रीय जंतनाशक मोहिम शासकीय व खाजगी शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यांत यावी व सर्व स्तरावर मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यांत यावे अश्या सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा यंत्रणेने नियोजन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. आठल्ये यांनी यांच्याहस्ते रत्नागिरी शहरातील नगर परिषदेच्या लक्ष्मीचौक येथील लोकमान्य टिळक विद्यालय येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला.www.konkantoday.com