
रत्नागिरीत पार पडले कॉंग्रेसचे भाजपाविरोधात चिखल फेको आंदोलनचिखल फेको आंदोलन
रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस भवन रत्नागिरी येथे करण्यात आले. चिखलफेक आंदोलन करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पाटणे यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे वतीने चिखल फेको आंदोलन करण्यात आले.राज्यातील जनता नानाविध समस्यांचा सामना करत आहे, पण सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे आणि कमिशन घेणे एवढेच काम करत आहे. सर्वत्र महागाई, बेरोजगारी, पेपर फुटी, महिला सुरक्षा, खते व बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकर्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्यासाठी चालवलेली चालढकल, बेदरकारपणे वाहने चालवून श्रीमंतांच्या मुलांकडून अपघात घडणे, दिवसा ढवळ्या खून व दरोडे यासारख्या घटना वाढल्या आहेत. यामुळे राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था इत्यादी समस्या असताना मात्र सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सांगितले. www.konkantoday.com