*रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथे आंबा बागेला अचानक आग,शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान*
___रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथे बुधवारी आंबा बागेला अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज असून आगीत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.या आगीत किसन घाणेकर यांची १५ काजूची झाडे जळून खाक झाली. ऐन हापूस आंबा आणि काजूच्या हंगामामध्ये ही आग लागल्यामुळे घाणेकर यांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये त्यांचे सुमारे २१ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीमुळे आजुबाजूला असलेले बागायतदार गणपत धामणे, शिवराम धामणे, यशवंत गोधळी या शेतकऱ्यांनाही आगीची झळ बसून त्यांचेही नुकसान झाले आहे. www.konkantoday.com