*नेहरू युवा केंद्र संगठन राष्ट्रीय युवा संसद महोत्सव – २०२४* *स्पर्धकांनी mybharat.gov.in वर १६ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करावी
**रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) – “नेहरू युवा केंद्र संगठन (भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय) अंतर्गत राष्ट्रीय युवा संसद महोत्सव – २०२४ आयोजित करण्यात आला असून स्पर्धकाला हिंदी, इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये विषय मांडावा लागणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी mybharat.gov.in या पोर्टल वर १६ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करावी. पोर्टल नोंदणी करण्यासाठी अडचणी येत असल्यास दिनांक १६ फेब्रुवारी पर्यंत सायंकाळी ५ वा. च्या आधी qnykratnagiri@gmail.com वर नोंदणी फॉर्म सबमिट करावा. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र रत्नागिरी ऑफिस पत्ता- 719,ई-विंग बिल्डिंग के सामने, संकेश्वरनगर, गांधी कम्पाऊंड, आरोग्य मंदिर, रत्नागिरी-415612 येथून प्राप्त विहित अर्जामध्ये अर्ज सादर करू शकतात. अधिक माहितीसाठी NYK रत्नागिरी ऑफिस येथे संपर्क साधा किंवा qnykratnagiri@gmail.com वर ईमेल लिहा किंवा 02352-295804/9176093429 वर संपर्क साधा, असे आवाहन नेहरु युवा केद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.* स्पर्धेचा वेळ जास्तीत जास्त ४ मिनिटे असेल. स्पर्धकांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्ष (०१ फेब्रुवारी २०२४) पर्यंत असावे. यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने, राज्यस्तरीय स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने, तर राष्ट्रीय स्तरावर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणारी बक्षिसे – प्रथम – दोन लाख रुपये, द्वितीय – १ लाख ५० हजार रुपये व तृतीय – एक लाख रुपये आणि उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी ५० हजार रुपये. जिल्हास्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांक स्पर्धक हा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे व राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक स्पर्धकास राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांसाठी संसदेत आमंत्रित केले जाणार आहे.