मोटरमनने प्रगती एक्स्प्रेससमोर जीव दिला, शंभरपेक्षा जास्त लोकल रद्द; मुंबईकरांचे हाल
सिंगल पासिंगची घटना घडल्यानंतर मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी काही कालवधीतच प्रगती एक्सप्रेससमोर उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. शनिवारी मृत्यू झालेल्या मोटरमनच्या अंत्यविधीला जाण्यासाठी आणि अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे शंभरपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द झालेल्या आहे. त्यामुळे शनिवारी मुंबईकरांचे मोठे हाल झाले
शुक्रवारी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी सँडहर्स्ट रोड ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान सीएसएमटी जाणाऱ्या प्रगती एक्सप्रेस समोर ट्रेनसमोर उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्या पूर्वी शुक्रवारी सकाळी मुरलीधर शर्मा पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये कर्त्यव्यावर होते. यादरम्यान सीएसएमटीकडे लोकल घेऊन जात असताना त्यांच्याकडून कुर्ला स्थानकात सिग्नल पासिंगची घटना घडली. घटना घडल्यानंतर त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. त्या भीतीने काही वेळातच मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी सीएसएमटी ते भायखळा स्थानक दरम्यान वेगाने येणाऱ्या प्रगती एक्सप्रेस समोर येत आत्महत्या केली आहे.
शर्मा यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र त्यांचे नातेवाईक येणार असल्याने अंत्यसंस्काराची वेळ सायंकाळी ५ वाजता ठेवण्यात आली. शर्मा यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत मुख्य आणि हार्बरमार्गावरील शेकडो मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिला. तसेच मोटरमन अंत्यसंस्कारासाठी जाणार असल्याने मोटरमन उपलब्ध नव्हते. यामुळे मुख्य-हार्बर मार्गावरील कमी अंतराच्या शंभरपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.
मोटरमन शर्मा यांच्या अपघातीमृत्यूनंतर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (सीआरएमएस) मुंबई विभागाने मध्य रेल्वेला दोषी ठरवले. मोटरमन अतिरिक्त काम करतात. मात्र एखाद्या वेळी चुकून सिग्नल ओलांडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होते. मुळात अशा घटनांना अन्य बाबीही जबाबदार असतात. मोटरमनच्या जागा रिक्त असल्याने मोटरमनवर अतिरिक्त काम करावे लागत आहे, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com