
चिपळुणातील पवन तलावानजिक आढळला वृद्धाचा मृतदेह
चिपळूण : गुरुवारी दि.9 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शहरातील पवन तलाव मैदानानजिक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह 70 वर्षीय वृद्धाचा असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. पवन तलावालगत असणार्या नागरिकांनी पोलिसांना खबर दिली. यानंतर घटनास्थळी चिपळूण पोलिस दाखल झाले व हा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.