
तंदुरी नाईटसया एस पी हेगशेट्ये हॅाटेलल मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या थीम डीनर भव्य सोहळा*
-रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपेक्षित वंचीत हजारो मुलांना उच्च शिक्षण देणारे नवनिर्माण महाविद्यालयाचे शैक्षणिक कार्याची वाटचाल अत्यंत उल्लेखनिय आणि वैशिष्ठ्यपुर्ण आहे. येथील ग्रामिण भागातील विद्यार्थ्याला खर्या अर्थाने कौशल्याधारीत शिक्षण आणि उच्च रोजगाराच्या संधी देण्याचे अभूतपुर्व कार्याच्या माध्यमातून अभिजित हेगशेट्ये यांनी नवनिर्माण हा आदर्श pशिक्षणाचा मानदंडच जिल्ह्याला दिला आहे. असे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी तंदुरी नाईटस या एस पी हेगशेट्ये हॅाटेलल मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या थीम डीनर ह्या भव्य सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॅा. अलिमियाँ परकार, जेष्ट उद्योजक बापू शेट्ये, उद्योगपती रामकृष्ण कोळवणकर, जेष्ट नगरसेवक राजन शेट्ये, सुदेश मयेकर, संचालिका सीमा हेगशेट्ये, माजी सभापती बाबू म्हाप आदी मान्यवर उपस्थित होते.नवनिर्माण संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वाटचाली निमित्ताने हॅाटेल मॅनेजमेंट विभागाने थीम डीनर या प्रत्यक्षिक प्रकारातील तंदूरी नाईटस हा दोनदिवसाचा मेगा महोत्सव ३-४ फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता या तंदूरी नाईटस महोत्सवाचे उदघाटन प्रसंगी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी आपण गेल्या ८ थीम डीनर कार्यक्रमा पैकी ४ कार्यक्रमाला उपस्थित रहात रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत, व्यसायभिमुख शिक्षण देणार्या आणि कोकणच्या पर्यटन उद्योगात महत्वाचे योगदान देणार्या नवनिर्माण संस्थेच्या या शिक्षण चळवळीसोबत कायम जोडलेला असल्याचे अधोरेखीत केले. कोकणच्या पर्यटन आणि औद्योगीक विकासातील एक महत्वाचा भाग ह्या महाविद्यालयातील विद्यार्थी घडवत आहेत. मला संधी मिळाली असती तर मी याच महाविद्यालयात प्रवेश घेतला असता. इतर महाविद्यालयांपेक्षा नवनिर्माणची ओळख ही खर्या अर्थाने विद्यार्थीभिमुख आणि खर्या अर्थाने नवनिर्माणाची आहे. आजचा हा भव्य सोहळा विद्यार्थ्यांच्या अदभूत कौशल्या साधनेची साक्ष आहे.एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय हॅाटेल मॅनेजमेंट विभागाने कोविड नंतर प्रथमच थीम डीनर कार्यकम्राचे आयोजन केले होते. नवनिर्माणच्या भव्य प्रांगणात जिल्ह्यातील पहिला तंदूरी नाईटसचा हा प्रयोग होता. यात तंदूरी मुर्ग चाट, भाटी दा मुर्ग, मुर्ग आलीशान तीक्का, मुर्ग जहाँपनाह, मटन मुमताज अशा रुचकर पदार्थांची जणू आतषबाजीच होती, भाज्या आणि फुले, फळे यांचा कार्वींग स्टॅाल आणि जगलींग स्टॅाल हे उपस्थितांचे विशेष आकर्षण होते. रत्नागिरीच्या खवैंयासाठी तर हा विशेष महोत्सव ठरला या दोन दिवसात जवळपास पाच हजार खवैयांनी या महोत्सवाला भेट देत त्याचा आनंद लूटला आणि पुढील वर्षी किमान चार दिवस हा महोत्सव ठेवा अशी मागणी केली. हॅाटेल मॅनेजमेंट विभागाने हा महोत्सव करतांना अत्यंत उत्तम नियोजन केले होते. हे सारे नियोजन आयोजन हॅाटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी, प्राध्यापक ताराचंद ढोबळे, प्रा. शेफ मेघना शेलार, प्रा. सोनाली साठे त्यांचे सोबत प्राचार्या, आशा जगदाळे, प्रा. सुकुमार शिंदे, सचीन टेकाळे, सुशिल साळवी त्यांची एनएस टीम, नवनिर्माण महाविद्यांलयाचा सर्व स्टाफ, नवनिर्माण हायचा सर्व स्टाफ या सर्व टीमचे संस्था चेअरमन अभिजित हेगशेट्ये आणि संचालीका सीमा हेगशेट्ये यांनी मनापासून आभार मानले आणि यापुढे महाविद्यालयाच्या देदिप्यमान यशासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी अशीच संघटन भावना ठेवून काम करण्याचे आवाहन केले.www.konkantoday.com