
एकाच दिवशी ३ महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांसमोर पेच
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची, नगरपरिषदेची आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) परीक्षा २९ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षा देण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे,’ असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांशी खेळणे आणि त्यांना एका चांगल्या भविष्यापासून वंचित ठेवणे हा भाजपा सरकारचा नवा छंद असल्याचे दिसते. या शिवाय दुसरे काय कारण असू शकेल? एकाच दिवशी होणाऱ्या ३ महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे पर्याय मर्यादित होणार आहेत. आधीच रोजगाराच्या फार कमी उपलब्ध असलेल्या संधीमुळे त्या मर्यादित होणार आहेत.’
www.konkantoday.com