
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी येथील शिरगाव मुक्कामाची शताब्दी.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते. त्यांनी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल तेरा वर्षे रत्नागिरी शहर परिसरात वास्तव्य केले होते. त्यावेळी पसरलेल्या प्लेगच्या साथीमुळे सावरकर २७ नोव्हेंबर १९२४ रोजी रत्नागिरी शहराजवळच्या शिरगांव येथील विष्णूपंत दामले यांच्या घरी रहायला गेले. आज या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत.
सावरकर यांच्या आठवणी जपणारं हे चौसोपी कौलारू घर आणि या घरातील सावरकरांचे वास्तव्य असलेली खोली दामले कुटुंबियांनी अगदी निगुतीने जपली आहे.www.konkantoday.com