*भाजपने लोकशाही धोक्यात आणली -विश्वंभर चौधरी*
____________________केंद्रातील सत्ताधारी भाजपने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत देशातील लोकशाही धोक्यात आणली. सामान्य लोकांना विकासापासून वंचित ठेवून धनदांडग्या भांडवलशाहीचाच उदोउदो केला. त्यांची भरभराट होण्यास मदत केली. ईडीसारख्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून केवळ विरोधकांनाच नामोहरम केले. बड्या उद्योजकांची कर्जमाफी करताना पी. एम. केअर फंड आणि इलेक्ट्रोरल बॉण्डमध्ये कोट्यावधींचा घोटाळा केला. केंद्र सरकार विरोधात बोलणार्यांची मुस्कटदाबी केली जाते. या सरकार विरोधात लोकांनी निर्भयपणे बोलावे, आगामी निवडणुकीत जुलमी केंद्र सरकारला नारळ द्यावा, यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी राज्यभरात निर्भय बनो, ही सामाजिक चळवळ राबविली जात असल्याचे मत मानवी हक्क, संविधान विश्लेषक कार्यकर्ते, विचारवंत, पर्यावरणतज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांनी चिपळुणात जाहीर सभेत व्यक्त केले.शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात शुक्रवारी निर्भय बनोबाबत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आम्ही निर्भय रत्नागिरीकर यांनी या सभेचे नियोजन केले. यावेळी संयोजकांनी निर्भय बनो चळवळीचा हेतू स्पष्ट केला. www.konkantoday.com