
चिपळूणात रांगोळीतून साकारली भव्य आकर्षक श्रीराम अन् राम मंदिर प्रतिकृती!
अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं चिपळूणात दि.२२ जानेवारी रोजी, श्रीराम आणि राम मंदिर प्रतिकृतीचे भव्य रांगोळीच्या माध्यमातून चिपळूणच्या कलाकारांनी केलेला आविष्कार नागरिकांना बघायला मिळणार आहे.ही रांगोळी २०/१० फुट आकाराची आहे. ही रांगोळी काढण्यासाठी ५५ तास लागले असून त्यात १५ किलो रांगोळी वापरण्यात आलेली आहे. ही रांगोळी संत नामदेव समाज सभागृहाचा हॉल, बायपास रोड येथे साकारली आहे. ही रांगोळी दि. २१ जानेवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर नागरिक पाहू शकणार आहेत.
या रांगोळीचे उद्घाटन रविवारी मान्यवरांच्या हस्ते झाले. दि. २८ जानेवारी २०२४ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांना पाहाण्यासाठी खुली राहील. दि. २८ जानेवारी २४ रोजी या सर्व कार्यक्रमाचा सांगता समारंभ सायंकाळी ५ वाजता त्याच ठिकाणी होणार आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा हा जसा एक सामुहिक आनंदोत्सव उपक्रम आहे. त्याच प्रमाणे चिपळुणातही अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती रांगोळीतून साकारण्याचा हा सामूहिक कला आनंदोत्सव आहे. कलेच्या माध्यमातून रामाची सेवा, भारतीय परंपरेची जपणूक ह्या हेतूने हा उपक्रम चिपळूणात घेण्यात आला आहे. या सोबत श्रीराम आणि रामकथेवर आधारीत चित्र प्रदर्शनही असणार आहे.
चिपळूणातील प्रसिद्ध रंगावलीकार संतोष केतकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी आणि संतोष केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष शिगवण, श्री. आवले, कु. नंदिनी नवा उकार्ड, सौ. वर्षा देशपांडे, सौ. सोनाली खर्च, सौ. नीतासाडविलकर, कु. सुप्रिया खोत, कु. हा नीशा ओली, सौ. गीता चिंगळे, सौ. रजनी काटकर हे कलाकार रांगोळी काढण्यात सहभागी होते.
www.konkantoday.com