
दोन डोस घेऊनही सहा महिन्यांनंतरही शरीरातील अँडीबॉडी कमी होताहेत. त्यामुळे तिसरा बुस्टर डोस घ्यावाच लागेल -सायरस पुनावाला
दोन डोस घेऊनही सहा महिन्यांनंतरही शरीरातील अँडीबॉडी कमी होताहेत. त्यामुळे तिसरा बुस्टर डोस घ्यावाच लागेल. मी तिसरा बुस्टर डोस घेतला आहे, अशी माहिती सायरस पुनावाला यांनी दिली.
पुण्यातील टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक तसंच पूनावाला ग्रुपचे चेअरमन सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला.
ते लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
राजकारणी थापा मारत आहेत, वर्षाच्या अखेपर्यंत भारतात संपूर्ण लसीकरण होणे शक्य नाही, असं रोखठोक उत्तर सायरस पुनावाला यांनी दिलं आहे. आम्ही महिन्याला १० कोटी लसींचं उत्पादन घेतलं आहे. यामध्ये कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक केली आहे.
तिसऱ्या लाटेबाबत पुनावाला म्हणाले, तिसरी लाट कडक नसेल. कारण हार्ड इम्युनीटीमुळे अनेकांना बाधा होणार नाही.
आगामी येऊ घातलेली नोवोवॅक्स लस चांगली आहे. अमेरिकेत त्या कंपनीला लायसन्स मिळेल तेव्हा आम्हाला मिळेल.
आम्हाला लायसन्स मिळालं की ती बाजारात येईल.’
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रणाबाबत ते म्हणाले, लसीचा मिक्स डोस घेण्याची गरज नाही. ते मिक्स केलं तर दोन्ही लसींमुळे प्रभाव कमी होईल.
www.konkantoday.com