
२६ जाने पर्यंत कोकण रेल्वेवरील आमच्या सर्व मागण्या मान्य करा अन्यथा सावंतवाडीच्या पुढे रेल्वे जाऊ देणार नाही : श्री.शांताराम नाईक
कोकणात मामाच्या गावाला जाणारी झुगझुग आगीन गाडी धावली ती मुळात स्वर्गिय प्रा.मधू दंडवते यांच्यामुळे. त्यांनी कोकणासाठी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच रविवार दि.१४ जाने.२०२४ रोजी महाजनवाडी भावसार सभागृह परळ येथे समिती अध्यक्ष मा.श्री.शांताराम नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार - मा.श्री.अरविंद सावंत साहेब आणि मनसे नेते मा.मंत्री मा.श्री.बाळा नांदगावकर साहेब यांच्या प्रमूख उपस्थितीत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीसह कोकणातील २३ सहयोगी सामाजिक संस्थांच्यावतीने दंडवते साहेब यांचा जन्मशताब्दी सोहळा पार पडणार आहे.त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सन १९७१ मध्ये राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर प्रथम त्यांनी कोकण रेल्वे कार्पोरेशन ची स्थापना करून एकीकडे आकाशाला गवसणी घालणाऱ्या सहयाद्रीच्या पर्वत रांगा तर दुसरीकडे पाताळाचा वेध घेतील अशा खोल दऱ्या अशा घनदाट डोंगराळ भागातून कोकण रेल्वे धावेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते मात्र हे अशक्यप्राय आव्हान दंडवते यांनी पेलले,कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक व केरळ राज्यांमध्ये त्यावेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सरकार असतानाही मुंबई ते ठोकूर मेंगलोर हा ७३८ किमी चा मार्ग चक्क ८ वर्षात जॉर्ज फर्नांडिस आणि ई श्रीधरन ह्या जिद्दी सहकाऱ्यांच्या साथिने बनवून हे स्वप्न पूर्णही केले म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेचे शिल्पकार ठरले.
कोकणकरांनो,कोकणात रेल्वे तर धावली मात्र मागील २५ वर्षात येथील भूमिपुत्रांला रेल्वेच्या गर्दीतून गुदमरून प्रवास करावा लागत आहे, ज्या महाराष्ट्र राज्याने कोकण रेल्वेत सर्वाधिक २२% गुंतवणुक केली त्यांच्या वाटयाला फक्त तीनच रेल्वे आल्या,कोकणात टर्मिनस नसल्याने ग णपती बाप्पा कोकणात व सर्व गणपती स्पेशल रेल्वे गोवा व कर्नाटकात तसेच टर्मिनस नसल्याने वसई सावंतवाडी पॅसेंजर,कल्याण सावंतवाडी पॅसेंजर,दादर चिपळूण मेमू व मुंबई रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेसची मागणी करूनही मिळत नाहीत.कोकण रेल्वेचे खाजगीकरण थांबवून त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे किंवा त्याचे स्वतंत्र्य झोन बनवावे,प्रत्येक स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवून त्याला जास्तीचे हॉल्टस मिळावेत,सर्व सुपरफास्ट रेल्वे मिरज मार्गे मडगावला वळवाव्यात किंवा त्यांना जास्तीचे हॉल्ट दयावेत ह्या आमच्या मागील अनेक वर्षाच्या प्रमूख मागण्या आहेत.
आजच्या गलीच्च राजकारणाकडे पाहील तर नक्की वाटते की कदाचित दंडवते नसतात तर कोकणात रेल्वे आलीच नसती,म्हणूनच आमच्या अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने समस्त कोकणवासिय कोकण रेल्वेवर काम करणाऱ्या बिगर राजकीय कोकणातील २३ प्रवासी संघटना / सामाजिक संस्था एकत्र आलो आहेत यामध्ये १) कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजि. ठाणे, २) वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना - वसई विरार, ३) कोकण रेल्वे प्रवासी संघटना - मुंबई, ४) अखिल कोकण विकास महासंघ, ५) रेल्वे सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी रजि.६) गणेशभक्त कोकणवाशीय प्रवासी संघटना - लालबाग परळ, ७) कोकण रेल्वे जागरूक प्रवासी संघ - बोरीवली, ८) रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ - नवी मुंबई, ९) डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी रेल्वे प्रवासी संघटना रजि. - डहाणू , १०) निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण फेसबुक गृप ११) जल फाउंडेशन - खेड, १२) सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, १३) कुणबी युवामंच मुंबई - माणगाव १४) विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई / ग्रामीण,१५) कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती - चिपळूण, १६) आम्ही वसई विरारकर,१७) हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे - अंजली पंचक्रोशी संघर्ष समिती १८) मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती, १९) आम्ही पालघरकर, २०) आवाहन फॉर परिवर्तन संस्था - नवीन पनवेल, २१) आमची पश्चिम रेल्वे - मुंबई,२२) बोरीवली सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना - बोरीवली २३) ऑल जर्नालिस्ट रत्नागिरी यांच्या वतीने जन्मशताब्दी चे आयोजन करण्यात येत आहे,समविचारी अनेक संस्था एकत्र येत शासनावर दबाव आणणारा हा कदाचित कोकणातील पहिलाच प्रयोग असेल.
यावेळी समिती प्रमूख श्री.राजू कांबळे,उपाध्यक्ष श्री.तानाजी परब, श्री.दिपक चव्हाण,श्री.अक्षय महापदी,सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार,श्री.दर्शन कासले,कोषाध्यक्ष श्री.राजाराम कुडेकर,सल्लागार श्री.सुनिल उत्तेकर,श्री.श्रीकांत सावंत,श्री.सुरेंद्र नेमळेकर,श्री.परेश गुरव,श्री.सुभाष लाड,अॅड.श्री.संजय गांगनाईक,सहसंपर्क प्रमूख श्री.अभिषेक शिंदे तर कार्यकारणी सदस्य श्री.रमेश सावंत,श्री.मिलींद रावराणे,श्री.संजय सावंत,सौ.संजना सावंत व सर्व सहयोगी संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
मागील २५ वर्षात कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या अनेक मागण्या आहेत,पाठपुरावा करूही त्या मिळत नसतील तर ह्या कोकणातील नेत्यांना त्यांची जागा दाखवावीच लागेल.२६ जाने.पर्यंत आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा सावंतवाडीच्या पुढे रेल्वे जाऊ देणार नाही,यासाठी २६ जाने.२०२४ रोजी सकाळी १० वा. सावंतवाडी रेल्वेस्टेशन येथे जेलभरो आंदोलनात समस्त कोकण वासियांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष श्री.शांताराम नाईक यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समिती प्रमूख श्री.राजू कांबळे व सेक्रेटरी श्री. यशवंत जडयार यांनी केले.
www.konkantoday.com