
कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक.
शासनाने कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील 700 स्थानिक उमेदवारांना बसला आहे. त्यांना आता घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. या निर्णयाविरोधात उमेदवार आक्रमक झाले असून रविवारी सर्व उमेदवारांनी एकत्र येत निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करून निर्णय अबाधित ठेवावा, अशी मागणीही केली आहे. राज्य शासनाने 23 सप्टेंबर 2024 रोजी 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यात 700 स्थानिक बी. एड., डी.एड बेरोजगारांना रोजगार मिळाला.
त्यांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना 15 हजार रुपये मानधन देण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यात 700 शाळांना याचा फायदा झाला. यामुळे शैक्षणिक समतोल राखण्यास यश मिळाले. तसेच गुणवत्ता वाढीसाठी याचा फायदा झाला. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. शेवटी 10 फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा घेतला गेला. तसा जीआर शासनाकडून काढण्यात आला.