अज्ञात कारणावरून वृद्धाची गळफास घेवून आत्महत्या
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे वृद्धाने गळफास घेवून आत्महत्या केली. जयप्रकाश सीताराम मालगुंडकर (७०, रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. जयप्रकाश यांनी आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे अद्याप समजून आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ च्या सुमारास जयप्रकाश यांचा मृतदेह राहत्या घरी दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. या घटनेची खबर रत्नागिरी शहर पोलिसांत देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच जयप्रकाश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालय येथे पाठविण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com