चिपळूण शिवाजीनगर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर सुशोभिकरणाची दुरावस्था


चिपळूण शहरातील शिवाजी नगर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर लायन्स क्लब ऑफ चिपळूणच्या पुढाकारातून सुशोभिकरण करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत त्याच्या देखभाल अभावी या सुशोभिकरणाचा बट्ट्याबोळ उडाला असून तो संपूर्ण परिसर झाडीझुडपाने वेढला आहे.
शहरातील काही मोजक्याच जागांवर सुशोधिकरण व्हावे यासाठी लायन्स क्लब ऑफ चिपळूणच्या माध्यमातन त्या जागा विकवित करण्यात आल्या होत्या. शिवाय शहराच्या वैभवात काहीशी भर पडली होती. प्रवाशांच्यादृष्टीने महत्व प्राप्त असलेल्या शहरातील शिवाजी नगर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर जांभा दगडाचे नक्षीकाम करून यातून हा प्रवेशद्वार सुशोभित करण्यात आला होता. यामुळे बसस्थानकात येणार्‍या प्रवाशांसाठी हे सुशोभिकरण एक लक्षवेधी ठरत होते, असे असताना काही वर्षापासून या सुशोभिकरणाकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने परिणामी या सुशोभिकरणाचा पूर्णतः बट्‌‌‌याबोळ उडाला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button