प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘एसटी’ स्थानकावर ‘आपला दवाखाना’ ; ताफ्यात लवकरच ३४९५ नवीन गाडया
राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी राज्य परिवहन महामंडळाला दिले.प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षांत ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार असून बस स्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात ३४९५ नवीन गाडया खरेदी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल शिंदे यांनी अभिनंदन केले
www.konkantoday.com