आंबा बागायतदारांनी घेतले तंत्रज्ञानात्मक व्यापाराचे धडे
सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ऍग्रो बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ रत्नागिरी या कृषी विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा पिकासाठी उत्तम कृषी पद्धती या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या १२५ आंबा बागायतदारांनी आंबा व्यापाराची तंत्रज्ञानात्मक बाजू जाणून घेतली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी जिल्ह्यातील जास्तीत शेतकर्यांनी आंबा लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याच सांगितले.
आपले उत्पादन सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानासोबतच शासकीय योजनांचा आंबा बागायतदारांनी लाभ घ्यावा त्याप्रमाणे एक चांगला उत्पादक घडवण्यासाठी नहमी प्रयत्नरत रहावे. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणार्या विविध योजनांचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा तसेच आंबा पिकाची लागवड करताना पारंपारिक पद्धतीने न करता त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, अशा शब्दात उपस्थित बागायतदारांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी सुनंदा कुर्हाडे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात प्रशिक्षण अधिकारी, एमसीडीसी हेमंत जगताप यांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत जिल्ह्यामध्ये मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आंबा पिकाबरोबरच इतर फळे व भाजीपाला पिकांसाठी भविष्यामध्ये काढणीपश्चात तंत्रज्ञान आधारित अशा स्वरूपाचे एक दिवसीय कार्यक्रम घेतले जातील. शिवाय अशा आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
www.konkantoday.com