पालकमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना करण्यात आले मार्गदर्शन
-पालकमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना करण्यात आले
रत्नागिरीतील नवोदित खेळाडूंनी शिबिराला लावली हजेरी
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांच्या संकल्पनेतुन रत्नागिरीमध्ये नवोदित क्रिकेट खेळाडूंना क्रिकेट संदर्भात मार्गदर्शन मिळावे क्रिकेटमधील चतुराई कळावी यासाठी आगळा वेगळा उपक्रम म्हणून क्रिकेटचे मार्गदर्शन शिबिर आज रत्नागिरी येथे संपन्न झाले.
या मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असे माजी कसोटीपटू प्रविण आमरे यांची उपस्थिती लावली होती.हे शिबीर रत्नागिरी हॉटेल सिल्व्हर स्वान
माळ नाका येथे घेण्यात आले. या शिबिरासाठी रत्नागिरी तालुक्यातील आणि चिपळूण तालुक्यातील तसेच विविध भागातील नवोदित क्रिकेटपटू यांनी हजेरी लावली होती.
नवोदीत खेळाडूंसाठी मार्गदर्शन मिळावें म्हणून व ,वेगेवेगळ्या खेळाडूंचे अनुभव ,त्यांनी केलेला संघर्ष ,तसेच मुलांनी मानसिकदृष्ट्या कणखर कसे व्हावे, सराव कोणत्या पद्धतीचा असावा मानसिकता कोणत्या पद्धतीने तयार केली पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या अनुभवांमधून प्रवीण आमरे यांनी या मार्गदर्शनाच्या वेळेस दिली. पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यामुळे या मिळालेल्या मार्गदर्शनामुळे होऊ घातलेल्या नवीन क्रिकेट खेळाडूंना एक वेगळी दिशा मिळाली असून ऊर्जा निर्माण झाली आहे. पालकमंत्री यांच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम होत असतात मात्र आगाळावेगळा उपक्रम येथील तरुण क्रिकेट प्रेमींना देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्याबद्दल चिपळूण रत्नागिरीतील नवोदित क्रिकेट खेळाडूनी पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांचे मनापासून आभार मानले आहेत. माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांनी केलेले आजच्या मार्गदर्शनामुळे भविष्यातील तयार होणाऱ्या क्रिकेटपटूंना एक वेगळा मार्ग सापडणार आहे. या कार्यक्रमाला कार्याधक्ष-बाळू साळवी, सचिव – बिपीन बंदरकर,किशोर भुते, मृत्युंजय खातू, बलाराम कोतवडेकर, सुनील घोसाळकर, सईद मुकादम,दिवा मयेकर, दीपक पवार, दीपक मोरे, सुरेश जैन, प्रतीक सावंत,केतन सावंत तसेच रत्नागिरीतील क्रिकेट रसिक उपस्थित होते.
www.konkantoday.com