गवत मारण्याचे औषध प्यायलेल्या तरुणाचा मृत्यू
चिपळूण: गवत मारण्याचे औषध प्यायलेल्या शुभम शरद मोरे (२६, रा. वेतकोंड, चिपळूण) याचा ३० ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता शुभम यास उल्टी होऊ लागल्याने त्याची चौकशी केली असता त्याने गवत मारण्याचे औषध प्यायल्याचे सांगितले. त्यास डेरवण हॉस्पिटल येथे
नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून पुढील उपचाराकरिता कराड कृष्णा हॉस्पिटल येथे नेण्यास सांगितले, परंतु कृष्णा हॉस्पिटल येथे सोय उपलब्ध नसल्याने पुढील उपचाराकरिता सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे येथे नेले. तेथे उपचारादरम्याने ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. शुभम हा मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
www.konkantoday.com