कसब्यातील कर्णेश्वर मंदिराचे होणार नूतनीकरण
पंतप्रधान नरेंद्र यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त नमो ११ सूत्री कार्यक्रमांतर्गत राज्यातील ७३ पवित्र, ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यासाठी निवड आली आहे. या
कार्यक्रमांतर्गत ऐतिहासिक स्थळांचा, मंदिरांचा जीर्णोद्धार, प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे, डिजिटल दर्शन, परिसर सुशोभिकरण, स्वछता आदी गोष्टी अभियानांतर्गत करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एक मात्र अशा कसबा येथील हेमाडपंथी बांधणीच्या कर्णेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.
www.konkantoday.com