दारूच्या व्यसनात चॉकलेट समजून थेट रेटॉल ट्यूब खाल्ल्याने एका ५८ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू
दारूच्या व्यसनात चॉकलेट समजून थेट रेटॉल ट्यूब खाल्ल्याने एका ५८ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू होण्याची घटना घडली आहे
हा धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात कावळीतळी परिसरात घडला आहे. मकसुद हाजम भाई (वय ५८ वर्ष रा.काविळतळी ता. चिपळुण) असे मृत्यू झालेला इसमाचे नाव आहे.
९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ज्युपीटर हॉस्पिटल, पुणे येथे उपचार सुरू असताना विषारी पदार्थ सेवन केलेल्या या इसमाचा मृत्यू झाला आहे.मकसुद यांना दारूचे व्यसन होते. दारू प्याल्यानंतर त्यांना चॉकलेट खाण्याचीही सवय होती. मात्र, ही सवय त्यांच्या थेट जीवावरती बेतली आहे. चिपळूण शहरातील कावीळतळी परिसरात राहणारे मकसूद यांनी ५ नोव्हेंबर रोजी रात्री दारू पिल्यानंतर चॉकलेट खाण्याची सवय असल्याने रात्री त्यांनी चॉकलेट समजुन रेटॉल ट्यूब दारुच्या नशेत खाल्याने याचा त्रास त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी होऊ लागला. ६ नोव्हेंबर रोजी त्यांना अस्वस्थ होऊ लागल्याने व उलट्या होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ चिपळूण शहरातील एस. एम. एस. हॉस्पिटल येथे दाखल केले.त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी ज्युपीटर हॉस्पिटल पुणे येथे हलविण्यात आले होते. येथे त्यांच्यावरती उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com