शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा
रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालय मारुती मंदिर येथे राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी -रायगडचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आली यावेळी उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत यांनीहिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करत हार अर्पण करून अभिवादन केले.
राज्यभरता हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी केली जात असून रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या संपर्क कार्यालयात हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची स्मृतीदिन साजरी साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रमुख राहुल पंडित,तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, जिल्हा महिला जिल्हा प्रमुख शिल्पाताई सुर्वे, महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, महिला शहर प्रमुख स्मितलताई पावसकर, माजी नगरसेवक निमेश नायर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, माजी नगरसेवक बंटी किर, अभिजीत गोडबोले, दिपक पवार, प्रशांत सुर्वे, माजी नगरसेवक विकास पाटील, अभिजीत दुडये, राहुल रसाळ, सुनील शिवलकर, अजीम चिकटे, आशुतोष तोडणकर, प्रथमेश साळवी, अथांग कदम, सर्वेश शेलार, आशू मोरे, संदेश किर, राहुल रसाळ, माजी नगरसेवक मुसा काजी आदी पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
www.konkantoday.com