दापोली थंडी ऐवजी तापमानात वाढ
दापोली तालुक्यात कमाल, किमान तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. हिवाळा सुरू झालेला असला तरी दापोलीकर मात्र उन्हाच्या झळा सोसत असल्याचे चित्र पहायला मिळत.आहे. दापोलीचा किमान तापमान २०.५ तर कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस असून दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ टक्के तर सकाळची ९५ टक्के असल्याची नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. ऑक्टोबर हिटनंतर दापोलीकर
थंडीची वाट पाहत आहेत. परंतु त्यात पुन्हा उष्णता वाढल्याने दापोलीकर अक्षरश: हैराण झाले आहेत.
www.konkantoday.com