
महावितरणच्या 16 लाखाहून अधिक ग्राहकांकडील वीज मीटर फॉल्टी
राज्याच्या कानाकोपऱ्यात वीज पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या महावितरणचा ‘फॉल्टी’ कारभार असल्याचे समोर आले आहे. महावितरणच्या एकूण ग्राहकांपैकी तब्बल 16 लाख 29 हजार ग्राहकांकडे सदोष (फॉल्टी) वीज मीटर असल्याचे महावितरणच्याच माहितीवरून समोर आले आहे.त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक मीटर रिडींग होत नसल्याने कुठे वीज ग्राहकाला तर कुठे महावितरणला आर्थिक भुर्दंड बसत आहे.
महावितरणकडे मुंबई वगळता राज्यभरात वीज वितरण करण्याचा परवाना आहे. त्यानुसार ग्राहकांना नवीन वीज जोडणी देणे, मागणानुसार वीज पुरवठा करणे बंधनकारक आहे. तसेच ग्राहकाने वापरलेल्या विजेची मोजणी करण्यासाठी अवश्यक असलेले मीटरही महाविरतणकडूनच पुरवले जातात. सदर मीटरची किंमत 1200 रूपयांपर्यंत असून ते झीनस, सेक्युर, एल अॅण्ड टी, रोलेक्स या कंपन्यांकडून खरेदी केले जातात. त्यानुसार महावितरणचे सध्या राज्यभरात 2 कोटी 27 लाख वीज ग्राहक आहेत. त्यापैकी 7.2 टक्के म्हणजे 16 लाखाहून अधिक ग्राहकांकडील वीज मीटर सदोष असल्याचे महावितरणच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. वीज मीटरच फॉल्टी असल्याने ग्राहकांना वीज वापराच्या तुलनेत आवाच्या सवा वीज बिले येत आहेत.
www.konkantoday.com