
महाड औद्योगिक वसाहतीतील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत झालेल्या स्फोटातील बेपत्ता ४ कामगारांचेही मृतदेह सापडले
रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत झालेल्या स्फोटातील बेपत्ता ४ कामगारांचेही मृतदेह सोमवारी दिवसभरात एनडीआरएफ पत्रकाच्या शोधकार्यादरम्यान हाती लागले. मृतांची संख्या ११ वर पोहचली आहे. मृत कामगारांची ओळख पटवण्यात यंत्रणांना यश आलेले नाही.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत एकामागोमाग एक झालेल्या स्फोटाने रायगड जिल्हा पुरता हादरला. स्फोटात ७ कामगारांचा हकनाक बळी गेला. तर अन्य चार कामगार बेपत्ता होते. चौथ्या दिवशी एनडीआरएफ पथकाचे शोधकार्य सुरूच होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर आणखी ४ मृतदेह सापडले.
www.konkantoday.com