दापोली तालुक्यामधील वळणे येथे प्रौढाची आत्महत्या

दापोली तालुक्यामधील वळणे-बौद्धवाडी येथे राहणार्‍या शशिकांत मोहिते या ५८ वर्षीय प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर बुधवारी १.३० च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकांत मोहिते हे ३१ ऑक्टोबर रोजी घरी न गेल्याने त्यांची दिवसभर शोधाशोध करण्यात आली परंतु ते आढळून आले नाहीत. म्हणून मोहिते बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. त्यानंतर शशिकांत मोहिते यांच्या मूळ गावी वळणे बौद्धवाडी या ठिकाणी शोधण्यासाठी गेले असता जुन्या बंदिस्त घराच्या भालाला शशिकांत मोहिते यांनी पिवळ्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button