आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला
आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.अध्यक्षांनी १६ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश शिंदे आणि ठाकरे गटाला दिले आहेत.
ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाने व्हिपबाबत केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचा व्हिप अवैध असल्याचं म्हटलं होतं असं ठाकरे गटाचे वकील म्हणाले. ठाकरे गटाने युक्तीवाद करताना म्हटलं की, आम्ही सर्व आमदारांना व्हिप जारी केला होता. दुसरीकडे, शिंदे गटाने दावा केला की त्यांना व्हिप मिळालेला नाही.ठाकरे गटाने म्हटलं की ईमेल द्वारे सर्व आमदारांना व्हिप जारी करण्यात आला होता. शिंदे गटाने ठाकरे गटाचा दावा फेटाळला. या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
www.konkantoday.com