राज्यांना वीजनिर्मितीवर कर आकारणीचा अधिकार नाही, ऊर्जा मंत्रालयाची अधिसूचना
कोणत्याही राज्य सरकारला कोळसा, पाणी, वायू आणि सूर्यप्रकाशापासून तयार केलेल्या विजेवर कर किंवा शुल्क आकारण्याचा अधिकार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. यावर राज्यांनी लावलेले कर बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने २५ ऑक्टोबर रोजी अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले.अशा कोणत्याही प्रकारे अतिरिक्त कर किंवा शुल्क आकारले जात असेल तर ते तत्काळ परत करावे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही स्रोताद्वारे निर्माण केलेल्या विजेवर तसेच आंतरराज्य विजेच्या पुरवठ्यावर राज्यांनी कोणताही अतिरिक्त कर किंवा शुल्क आकारू नये, असे स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com