२२ वर्षीय तरूणाने गळफास लावून केली आत्महत्या
खेड तालुक्यातील अजगणी-बौद्धवाडी येथील २२ वर्षीय तरूणाने राहत्या घरीतील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ऋतिक मनोहर मोहिते असे मृत तरूणाचे नाव आहे. कोणत्या तरी अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.