
महाराष्ट्रात लई वळू माजलेत, त्यांचा माज नक्की उतरवू,’-मनोज जरांगे पाटील
मुंबईतल्या अनेकांना माज आला आहे. तो माज उतरविण्याचे औषध मराठ्यांजवळ आहे. त्यामुळे एकदा मुंबईत जायचे आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात लई वळू माजलेत, त्यांचा माज नक्की उतरवू,’ असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना उद्देशून दिला.जरांगे म्हणाले, ‘एक मुलगा म्हणून लढतोय. आंदोलनामुळे शरीर साथ देत नाही. खूप त्रास होतोय, मी मरणाच्या दारात उभा आहे. खोटं बोलणार नाही, मागे हटणार नाही. आपली लेकरं मोठी करायची आहेत. राजकीय पक्ष आणि नेते मोठे करायचे नाहीत.माझा समाज मोठा झाला पाहिजे, हा माझा अट्टहास आहे. मराठे एक नाहीत म्हणणाऱ्यांना एकी दाखवून दिली. मी बोलतो ते करून दाखविणार. आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही आणि हटायचे नाही. सर्वजण अशीच एकजूट दाखवा.’