शासकीय कार्यालयामधील लेट लतिफांना बसणारचाप,हजेरीचा थम्ब देताना आता फोटोही होणार स्कॅन
शासकीय कार्यालयामधील लेट लतिफांना चाप बसविण्यासाठी शासनाने आता हजेरीचा थम्ब देताना फोटो स्कॅन होणारी यंत्रणा आणखी आहे. सध्या प्रांत व तहसील कार्यालयामध्ये हे मशिन बसवले जात असून काही कार्यालयामध्ये यापूर्वीच बसवण्यात आले आहे.
काही वर्षे जाता प्रशासकीय नोकरी चांगली असे म्हटले जात होते. मात्र अलिकडच्या काळात कामाचा वाढलेला व्याप, त्यांचा निपटारा करताना येणारा नाकीदम, शासनाचे दरदिवशी बदलणारे नियम याचा विचार करता याच नोकरीत आता दम राहिलेला नाही, अशा प्रतिक्रिया काही विद्यमान कर्मचार्यांमधून उमटताना दिसत आहेत. ही एक बाजू असतानाच दुसरीकडे काही अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत असले तरी काहीजण आपल्या नियमित कामांमध्ये आळस करताना दिसतात. तसेच ते वेळेतही कार्यालयात येत नसून कार्यालयीन वेळेच्या आधीच घर गाठत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही वर्षापासून शासनाने थम्ब मशिन आणले होते, मात्र त्यात तितकेसे सातत्य व पारदर्शकता नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या मशिनला बाजूला करून संकणकावर हजेरी लावण्याची नवी पद्धत आणण्यात आली. तीही तितकीशी प्रभावी ठरली नाही. त्यामुळे आता थम देताना संबंधित अधिकारी, कर्मचार्यांचा फोटो स्कॅन करणारी नवी मशिन आणण्यात आली आहे. हे मशिन काही कार्यालयांमध्ये बसवण्यात आली आहेत. तर सध्या प्रांत व तहसिल कार्यालयांमध्ये बसवण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसात त्यात कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांची माहिती भरली जाणार असून त्यानंतर ते कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे नवीन मशिन किती प्रभावी ठरते, ते नजिकच्या काळात दिसणार आहे. www.konkantoday.com