केळंबेत वीजवाहिनीचा शॉक लागून ४ गुरे दगावली
विजेच्या खांबावरून तुटलेल्या विद्युतभारित वीजवाहिनीचा जोरदार शॉक लागल्याने लागून रानात चरणारी ४ दुभती गुरे दगावल्याची घटना लांजा तालुक्यातील केळंबे येथे शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ६.३० च्या दरम्याने घडली. यामध्ये मालकाचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील केळंबे येथील राजाराम मिर्या लांबोरे यांनी शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान आपली गुरे ही लगतच्या जागेत चरायला सोडली होती. यावेळी वीज खांबावरून तुटलेल्या विद्युतभारित वाहिनीचा शॉक २ गाई आणि २ म्हशी यांना बसला.
या घटनेत गुरांचा जागीच मृत्यू झाला. शॉक लागल्यानंतर गुरे ओरडत असल्याने राजाराम लांबोरे त्या ठिकाणी धावत गेले असता त्यांना वीजवाहिनीचा शॉक लागल्याचे लक्षात आले. या घटनेत लांबोरे यांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. www.konkantoday.com