आता त्या कोटा-बुटाला बुरशी लागली आहे-युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई
मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणून अनेक जण नवीन कोट शिवून,बूट पॉलीश करून बसले होते. आता त्या कोटा-बुटाला बुरशी लागली आहे. .अशी खरमरीत टीका युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदार नोंदणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात बैठका घेतल्या.
खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी,लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक,जिल्हाप्रमुख विलास चाळके,जिल्हा समन्वयक संजय पुनसकर,माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, माजी उपाध्यक्ष उदय बने, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, तालुका महिला संघटक साक्षी रावणंग, रूची राऊत, गीतेश राऊत, उपजिल्हाप्रमुख सुजीत कीर आणि संजय साळवी उपस्थित होते.वाशीपासून आम्ही दौरा सुरू केला आहे. आम्हाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात २०१८ साली आम्ही पहिल्यांदा युती म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु निवडणूकीत आम्हाला थोडक्यात अपयश आले. त्यामुळे या निवडणूकीत अधिक मेहनत घेऊन आम्ही विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पदवीधरांसमोर बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा निवडणूकीत असेल तसेच पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आवाज उठवू असे सरदेसाई म्हणाले.
www.konkantoday.com