स्थानिक गुन्हे शाखा व संगमेश्वर पोलीसांनीशिकारी करिता आलेल्या तिघांना बंदुकीसह घेतले ताब्यात
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून काही इसम संगमेश्वर येथील जंगलामध्ये वन्यजीवी प्राण्यांची शिकार करत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. सुरेश गावीत, संगमेश्वर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर यांना संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगाने दिनांक 13/10/2023 रोजी 00.15 वा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक संगमेश्वर येथील मौजे मुरडव-आरवली येथे गस्त घालत असताना त्यांच्या समोरून एका मोटर सायकलवरून तीन इसम आरवली च्या दिशेने येताना दिसले तसेच या मोटरसायकल वरील समोर बसलेल्या इसमच्या कपाळावर एक चार्जिंग हेड बॅटरी असल्याचे व पाठीमागे बसलेल्या एक इसमाच्या पाठीवर एक बंदूक असल्याचे निदर्शनास आले.
लागलीच या पथकाद्वारे समोरून येणार्या या मोटर सायकल वरील तिघांनाही थांबवण्यात आले व त्यांना नाव-गाव विचारण्यात आले तसेच त्यांच्याकडे सदर बंदुकीचा परवाना आहे आगर कसे? या बाबत विचारणा करण्यात आली परंतु सदर बंदुक ही विना परवाना असल्याची व हे तीनही मोटर सायकल स्वार संगमेश्वर येथील जंगलामध्ये वन्यजीवी प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याची खात्री पटली म्हणून लागलीच त्यांची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.
घेण्यात आलेल्या झडती मध्ये 1) विश्वास विष्णु हेमंत, 29 वर्षे, रा. माखजन, हेमंतवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, 2) रविंद्र आत्माराम गुरव, 35 वर्षे, रा. धामापूर तर्फे संगमेश्वर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी व 3) अभिजित गोविंद मांडवकर, 45 वर्षे, रा. आंबव-पोंक्षे, मांडवकरवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांच्या ताब्यातून एक सिंगल बॅरल काडतुस बंदुक, 6 जीवंत काडतुस, 1 मोबाईल फोन, 1 हेड चार्जिंग बॅटरी, 1 एलईडी चार्जिंग बॅटरी, 2 डब्यात गन पावडर व लहान मोठ्या आकाराचे शिस्याचे बॉल, 1 मल्टीपर्पज स्टिलचा चाकू व इतर शिकरीचे साहित्य मिळून आले.
वरील तीनही आरोपींना मोटर सायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे तसेच एकूण ₹ 83,260 चे शिकारीचे साहित्य जप्त करून संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर 87/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3(1), 25 भा.द.वि संहिता कलम 34 व मोटर वाहन कायदा कलम 128/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. सुरेश गावीत, संगमेश्वर पोलीस ठाणे व पथका द्वारे सुरू असताना आज दिनांक 13/10/2023 रोजी आणखिन एका आरोपीस
1) सुदेश हनुमंत मोहिते 33 वर्षे, रा. मखाजन, तालुका संगमेश्वर याला ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्याच्याकडून ₹10,000 किमतीची एक गावठी बनावटीची सिंगल बॅरल ठासणीची बंदुक जप्त करण्यात आलेली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे,
1) पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर, स्था.गु.अ.शा, रत्नागिरी,
2) पोलीस निरीक्षक श्री. सुरेश गावीत, संगमेश्वर पोलीस ठाणे,
3) पोउपनि श्री. विवेक साळवी, संगमेश्वर पोलीस ठाणे,
पोहेकॉ सुभाष नारायण भागणे, स्था.गु.अ.शा,
पोहेकॉ शांताराम झोरे, स्था.गु.अ.शा,
पोहेकॉ बाळू पालकर, स्था.गु.अ.शा,
पोहेकॉप्रविण खांबे, स्था.गु.अ.शा,
पोहेकॉ सत्यजित दरेकर, स्था.गु.अ.शा,
चालक पोशिअतूल कांबळे, स्था.गु.अ.शा,
पोहेकॉ/ सचिन कामेरकर, संगमेश्वर
पोना/ विश्वास बरगाले, संगमेश्वर
पोना/ विनय मनवल, संगमेश्वर
पोशि/रेवणनाथ सोडमिसे, संगमेश्वर
पोशि/गणेश बिक्कड, संगमेश्वर
पोशि सोमनाथ आव्हाड, संगमेश्वर व
पोशिप्रमोद रामपुरे, संगमेश्वर पोलीस ठाणे.
www.konkantoday.com