
दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात सदानंद कदमला सत्र न्यायालयाचा झटका, जामीन फेटाळला
दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांना सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला. सत्र न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुमारे तीन महिने राखून ठेवलेला निर्णय मंगळवारी देताना जामीन अर्ज फेटाळून लावला.
साई रिसॉर्ट बांधकामाशी संबंधित कथिक आथिक अफरातफर प्रकरणात सदानंद कदम आणि जयराम देशपांडे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
www.konkantoday.com