
भारतीय तटरक्षक दलातर्फे २९ युनिट रक्त जमा
रत्नागिरी नगर राजभाषा समन्वय समितीच्या सहभागाने नुकतेच रत्नागिरी विमानतळ येथे रक्तदान शिबीर राबविण्यात आले. या शिबीरात एकूण-२९ युनिट रक्त जमा करण्यात आले.
भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीद्वारे केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव या मोहिमेचा एक भाग म्हणून समाजात रक्तदानाच्या महत्वाविषयी जागरूकता पसरविणे आणि स्वेच्छेने रक्तदान घडवून आणणे या उद्देशाने आणि देशातील प्रत्येक शहरात आणि खेड्यात सर्वव्यापी आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने राबवण्यात येणार्या आयुष्यमान भव या मोहिमेचा प्रसार आणि प्रचाराचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीद्वारे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीच्या मदतीने आणि तटरक्षक दलाचे जवान, त्यांचे कुटुंबिय, रत्नागिरी नगर राजभाषा समन्वय समितीच्या सदस्य संस्थांचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या रक्तदात्यांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वी झाला.
www.konkantoday.com