आता राज्यात पुन्हा भूकंप होणार काय?
अजित पवार पुन्हा नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार कॅबिनेट बैठकीला गैरहजर होते. आजारी असल्याने अजित पवार बैठकीला आले नसल्याचं सांगण्यात आलंय.मात्र त्यामुळे सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. तसंच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलीय. छगन भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांनी फडणवीसांचीही भेट घेतली. पालकमंत्रिपदं न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे मंत्री नाराज असल्याचं समजतंय. अजित पवारांच्या गैरहजेरीवरुन राजकारण जोरदार सुरू झालंय. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भूकंप होणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
www.konkantoday.com