गणपतीच्या सणानंतरही दापोली एस.टी.बस आगाराची सेवा अनियमित,
गणपतीच्या सणानंतरही दापोली एस.टी.बस आगाराची सेवा अनियमित सुरू आहे. या अनियमित सेवेमुळे प्रवाशी वर्गाचे हालच हाल होत आहेत. दापोली तालुक्यासाठी असलेले दापोली शहरातील एस.टी. आगाराचा कारभार पूर्णपणे ढासळला असून कोणावर कोणाचेही अंकुश राहीलेले नाही त्यामुळे प्रवाशी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागतो आहे.दापोली एस.टी. आगाराचा कारभार सध्या राम भरोसे सुरू असून लांब पल्ल्यासह तालुक्यातील ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या नियमित एस.टी. बस या गौरी गणपतीच्या सणा नंतरही अनियमित सोडल्या जात असल्याने त्याचा फटका प्रवाशांना नाहक सोसावा लागत आहे.
www.konkantoday.com