लोवले येथे रिक्षा ओढ्यात कोसळली, एक जण जखमी
संगमेश्वर ते देवरूख प्रवासी घेवून वहाब अयुब दळवी रिक्षा घेवून प्रवाशांना सोडून रात्री ३ च्या सुमारास लोवले येथील नवनिर्माण कॉलेज येथील एका वळणावर दळवी यांचा गाडीवरील ताबा सुटून रिक्षा रस्ता सोडून खड्ड्यात पलटी झाली. या वेळी गस्त घालणारी पोलिसांची गाडी या मार्गावरून जात होती. दळवी रिक्षातून बाहेर येवून रस्त्यावर बसले होते. दळवी यांच्या डोक्याला मार लागलेला होता. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. तेथून त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
www.konkantoday.com