पुण्यातील मिरवणुकीत यंदा शंख वादन पथक सगळ्याचे आकर्षक
पुण्यातील मिरवणुकीत यंदा शंख वादन पथक सगळ्याचे आकर्षक दिसत आहे. पुण्यातील भाऊसाहेब रंगारी या गणपती मंडळाबाहेर या पथकाने शंखवादन केलं. यावेळी मोठं प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं.केशरी रंगाच्या वेशभुषेत हे पथक अगदी उठून दिसत होतं शंखासोबतच वेगवेगळी पारंपारिक आणि दुर्मिळ वाद्यदेखील वाजवण्यात आली. मागील सात ते आठ वर्षांपासून पुण्यात केशव शंखनाद पथक म्हणून आम्ही काम करत आहोत. आजपर्यंत आपण फक्त ढोल ताशा पथक, ध्वज पथक,लेझीम पथक असे ऐकूण होतो आणि बघितलंही पण शंखनाद पथक पुर्णपणे एक पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक शंख वाद्य एकत्रित वाजवणाऱ्यांचं पथक आहे आणि पुण्यातील हे एकमेव शंख पथक आहे, असं या पथकाचे प्रमुख सांगतात.
www.konkantoday.com