रत्नागिरीचे कीर्तनकार, शिक्षक किरण जोशी यांचे निधन
रत्नागिरी येथील कीर्तनकार व जीजीपीएस शाळेतील क्रीडा शिक्षक, गुरुकुलचे प्रमुख किरण जोशी (वय ४८) यांचे हृदयविकाराने आज दुपारी १२.४५ वाजता दुःखद निधन झाले. काही महिने ते कर्करोगाने ग्रस्त होते.
उत्तम शिक्षक, कीर्तनकार म्हणून नावाजलेले व सामाजिक बांधिलकीने सर्वांना मदत करणारे व्यक्तीमत्व हरपल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. किरण जोशी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९७५ रोजी झाला. ते जीजीपीएस शाळेत अनेक वर्षे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर शाळेने गुरुकुल सुरू केल्यानंतर गुरुकुलची जबाबदारी संस्थेने त्यांच्याकडे दिली. ते ही जबाबदारी उत्तम रितीने सांभाळत होते. त्यांना ज्ञानप्रबोधिनीचा अध्यापकोत्तम पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय अनेक ठिकाणच्या उत्सवात कीर्तन करत. धार्मिक कार्यक्रमात पौरोहित्य करत. गेल्या वर्षापासून ते आजारी होते. आज दुपारी त्यांचे निधन झाले.
www.konkantoday.com