
राष्ट्रवादीचे इच्छूक उमेदवार प्रशांत यादव यांनी घेतली शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची भेट.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी आपली पत्नी सौ. स्वप्ना यादव यांच्यासह शिवसेना नेते, माजी मंत्री आमदार भास्करशेठ जाधव यांचे त्यांच्या पाग येथील निवासस्थानी जावून आशीर्वाद घेतले.शिवसेना नेते आ. भास्करशेठ जाधव हे विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यानंतर मुंबईत शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत गेले. तेथून ते खूप दिवसांनी परत चिपळूण येथे आले असता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या वेळी सौ. स्वप्ना यादव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधवही हजर होते. www.konkantoday.com