21 सप्टेंबर रोजी मौजे पिंपळी बु, ता. चिपळूण येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवरील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज होणार नाही
*रत्नागिरी, – गणेशोत्सवामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या नियोजनासाठी मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे 21 सप्टेंबर रोजी मौजे पिंपळी बु, ता. चिपळूण येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवरील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज होणार नाही. या दिवशीच्या कामकाजाच्या पूर्वनियोजित वेळा या बुधवार 27 सप्टेंबर 2023 रोजी रिशेड्युल करण्यात आल्या आहेत.
तरी वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी व 21 सप्टेंबर रोजी वाहने ब्रेक टेस्ट ट्रॅकवर योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी आणू नयेत, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
www.konkantoday.com