राज्यातल्या सत्तासंघर्षासाठी आज महत्त्वाचा दिवस; ‘या’ दोन प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहेत.
त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागून आहे. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण चिन्हावर खरा अधिकार कुणाचा? याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहेसरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोग आणि १६ आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल केल्या होत्या. ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी देखील १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध देखील ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही आज म्हणजेच सोमवारीच सुनावणी होणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी सुनावणी झाली नव्हती.
www.konkantoday.com