ट्रेनचं वेळापत्रक कोलमडल्याने रेल्वेने येणारे चाकरमानी देखील अनेक तास रखडले
गणपती उत्सवासाठी कोकणात धावणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासात देखील मोठा विलंब होत आहे सुरक्षित व जलद प्रवास म्हणून चाकरमान्यांनी रेल्वेला पसंती दिली आहे दिवा स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावाला जाण्यासाठी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या ट्रेनचं वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. तर दुसरीकडे एसटी आणि खासगी बसेसनाही प्रचंड गर्दी झाल्याने चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. कुटुंबकबिल्यासह गावाकडे जायला निघालेल्या चाकरमान्यांची ऐनवेळी चांगलीच तारांबळ उडाली आहे.
गणपती स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक दुसऱ्या दिवशी कोलमडलं आहे. अनेक गाड्या अर्धा ते 4 तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी, मेंगलोर एक्सप्रेस, कुडाळ गणपती स्पेशल, दिवा – रत्नागिरी या गाड्या विलंबानं धावत आहेत. मुंबईकडून तळकोकणात येणाऱ्या मार्गावर अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. वीरपासून तळकोकणापर्यंत कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक आहे. मुंबईहून तळ कोकणात जाण्यासाठी रेल्वेने 12 तास लागत आहे. चार तास गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच चार तास खोळंबून राहावं लागत आहे.
www.konkantoday.com