
शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनावर ठाम
गेल्या दहा दिवसांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांनी आरोग्य सेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केल्याने आरोग्य सेवा उपक्रमांवर परिणाम झाला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या या कर्मचार्यांनी गेल्या २५ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील ७९५ कंत्राटी अधिकारी सहभागी झाले आहेत.
www.konkantoday.com